पालघर प्रतिनिधी | उत्तर प्रदेशाचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांची पालघरच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगी आदित्यनाथ यांनी काही तरी कारण देत शिवसेनेच्या प्रचारातून अंग काढून घेतल्याची चर्चा जोरात रंगत आहे.
मागील वर्षी पालघर मतदारसंघात पोट निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पायातील चप्पल नकाढता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार परिधान केला. त्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली. तर योगी आदित्यनाथ यांनी सुद्धाशिवसेनेवर तोंड सुख घ्यायचे सोडले नाही. आजची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही अशी टीका योगींनी शिवसेनेवर केली होती. अशा जुन्या वितुष्ठामुळेचयोगी आदित्यना थ यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली असे बोलले जाते आहे.
दरम्यान योगींना उत्तर प्रदेशात सभांचा व्यस्थ कार्यक्रम असल्याने योगी महाराष्ट्रासाठी वेळ काढू शकले नाहीत. मात्र त्यांच्या बदल्यात पालघरमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सभा घेण्यासाठी येणर आहेत अशी माहिती काल भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आता राजनाथ सिंह यांची सभा नालासोपाऱ्यात पार पडत आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेकडे रीतसर पाठ फिरवली आहे.