पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये तुम्हाला FD पेक्षा जास्त रिटर्न मिळतो; अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । बँक FD च्या घटत्या व्याजदरामुळे लोकं आता गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधत आहेत. मात्र, आर्थिक अस्थिरतेच्या काळात लोकं सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्या कामी येऊ शकतात. येथील गुंतवणूक सुरक्षितही आहे आणि रिटर्नही जास्त आहे. आज आपण येथे अशा काही पोस्ट ऑफिस स्कीम्स बाबत माहिती घेणार आहोत जिथे बँक FD पेक्षां जास्त रिटर्न दिला जातो.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

1. तुम्हाला NSC मधील गुंतवणुकीवर 8% वार्षिक व्याज मिळत आहे.

2. व्याज फक्त वार्षिक आधारावर मोजले जाते. मात्र ही रक्कम तुम्हाला कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळते.

3. तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा नाही.

4. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने NSC अकाउंट उघडता येते आणि 3 प्रौढांच्या नावाने जॉईंट अकाउंट उघडता येते.

5. त्याची खास गोष्ट म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील पालकांच्या देखरेखीखाली हे अकाउंट उघडू शकतात.

6. या योजनेअंतर्गत, तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स वाचवू शकता.

मंथली इनकम स्कीम

1. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना मंथली एक निश्चित रक्कम कमावण्याची संधी मिळते.

2. या योजनेमध्ये, तुम्हाला सिंगल किंवा जॉइंट अकाउंटमध्ये एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर या रकमेनुसार दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात.

3. येथे तुम्ही एका अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 5 लाख रुपये जमा करू शकता, तर जर जॉईंट अकाउंट असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतील.

4. या योजनेतील मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षे आहे.

5. या योजनेअंतर्गत 6.6 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे.

किसान विकास पत्र

1. KVP: या योजनेत कमीत कमी गुंतवणूकीची रक्कम 1000 रुपये आहे.

2. गुंतवणूक करण्यासाठीचे वय 18 वर्षे असावे. अल्पवयीन मुले पालकांच्या देखरेखीखाली गुंतवणूक करू शकतात.

3. सध्या या योजनेत 9 टक्के व्याज दिले जात आहे.

4. सिंगल अकाउंट आणि जॉईंट अकाउंटची सुविधा आहे.

5. अडीच वर्षांचा लॉक-इन पिरियड आहे. गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी तुम्हाला 5 वर्षे वाट पाहावी लागेल.

6. कलम 80C अंतर्गत इन्कम टॅक्स मध्ये सवलतही मिळते.