हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमध्ये सुरु झालेल्या रोख रकमेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेने ज्येष्ठ नागरिक व अपंगांना घरपोच रोख रक्कम उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु केली आहे. जेणेकरून त्यांना या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडावे लागू नये. या नवीन सेवेच्या मदतीने ते त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँकेतून पैसे काढण्यासाठी त्यांना हवे असलेल्या रकमेची रिक्वेस्ट पाठवू शकतात आणि त्यानुसार ही रक्कम त्यांच्या घरी पोहोचविली जाईल.
ही संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या
बँकेत बचत खाते असलेले कोणतेही ज्येष्ठ नागरिक या अॅपवर जाऊन रिक्वेस्ट टॅबवर त्यांना हवी असलेली रक्कम टाकू शकतील आणि नंतर त्यांना रक्कम सबमिट करावी लागेल. यानंतर बँकेचा कर्मचारी दोन दिवसांच्या आत तुमची रक्कम तुमच्या नोंदणी केलेल्या घराच्या पत्त्यावर पोहोचवेल. तुम्ही किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपयांची घरपोच डिलिव्हरी घेऊ शकता. बँकेच्या मते, घरगुती सुविधा असलेल्या ही रोख रक्कम घरपोच देण्याचा हेतू ग्राहकांचा बँकिंगचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि सुलभ करणे हा आहे. त्यामुळे बँकेला अशी आशा आहे की ही सुविधा बँक किंवा एटीएममध्ये जाणाऱ्या ग्राहकांचा त्रास कमी करेल आणि या लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांना आपल्या घरीच राहण्यास मदत करेल.
बँकेने डीबीटी सुविधा सुरू केली
बँकेने अलीकडेच डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर (डीबीटी) ही सुविधा देखील सुरू केली आहे ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पीपीबीएल बचत खात्यात ४०० पेक्षा जास्त सरकारी अनुदानाचा लाभ थेट ट्रांसफर करता येतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.