नाशिकमध्ये हनुमान चालिसावरुन तरुणाला बेदम मारहाण, CCTV फुटेज आले समोर

0
158
Nashik Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणाला 5 ते 6 जणांनी मिळून मारहाण केली आहे. हनुमान चालीसाच्या (hanuman chalisa) कारणावरून मारहाण झाल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. किशोर वाघमारे असे मारहाण करण्यात आलेल्या पीडित तरुणाचे नाव आहे. या मारहाणीप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कुठे घडली घटना ?
नाशिकच्या पाथर्डी भागातील लाईफ केअर पॅथॉलॉजी या खाजगी लॅबमध्ये हि घटना घडली आहे. या लॅबमध्ये घुसून येथे काम करणाऱ्या एका तरुणाला काही लोकांनी मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार लॅबमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हनुमान चालीसा (hanuman chalisa) लावण्यावरून आपल्याला ही मारहाण झाल्याचा आरोप पीडित किशोर वाघमारेने केला आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पाथर्डी फाटा येथील राजश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या लाईफ केअर पॅथॉलॉजी लॅब येथे किशोर रोज सकाळी लॅबला आल्यावर हनुमान चालीसा (hanuman chalisa) लावतो. नेहमीप्रमाणे त्याने हनुमान चालीसा लावलेली असताना 5 ते 6 जणांनी येथे येऊन हनुमान चालीसावरून वाद घातला. तसेच त्याला मारहाणसुद्धा केली असे किशोर वाघमारेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. तर जागेच्या वादातून हि मारहाण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. इंदिरानगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद

मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर

कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here