Wednesday, October 5, 2022

Buy now

चिंच तोडताना झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद । झाडावरील चिंच तोडताना तोल जाऊन खाली पडल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रोजी हर्सूल भागात घडली. हुसेन अहेमद शाह वय-३५ (रा.अण्णाभाऊ साठेनगर, वेरूळ. ह. मु. हर्सूल) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, शाह हे मजूर होते, विलास हरणे यांच्या शेतातील चिंचा तोडण्याचे काम त्यांनी घेतले होते. रविवारी ते चिंचा तोडत असतांना त्यांचा तोल गेला आणि ते झाडावरून खाली पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना सहकाऱ्यांनी तातडीने घाटी रुग्णालयात हलविले होते.

घाटी रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये उपचार सुरू असताना रविवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.