सिगारेट पिण्यासाठी तरुणाचा फ्रान्स ते स्पेन प्रवास!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे जगातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर केले गेले आहे. अशा परिस्थितीतही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत बरेच लोक घराबाहेर पडत आहेत. अशीच एक घटना फ्रान्समधून समोर आली आहे. जेथे एक माणूस फ्रान्सहून इटलीला जात होता. त्यावेळी तो पकडला गेला. लॉकडाऊन दरम्यान सिगारेट न मिळाल्याने हा माणूस फ्रान्सहून इटलीला जात होता.

हे प्रकरण दक्षिणेकडील फ्रान्समधील पर्पिग्नन या शहरातील आहे. शनिवारी स्पेनच्या ला जोन्सेरा शहरात एक व्यक्ती स्वस्त सिगारेट घेण्यासाठी पायी जात होती. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडले आणि दंडही ठोठावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पहिल्यांदा त्या व्यक्तीने कारने जाण्याचा विचार केला, परंतु त्याला चेकपॉईंटवर थांबविण्यात आले. त्यानंतर त्याने दोन देशांच्या सीमेला विभाजित करणारा डोंगराळ मार्ग निवडला.

येथे तो झुडुपातुन जात असताना धबधब्यात पडला. यानंतर त्याला पायरेनिस परिसरातील पोलिसांनी पकडले. धबधब्यात पडल्यानंतर त्या व्यक्तीला थंडी वाजु लागली. ज्यामुळे त्याची शुद्ध हरपली. या कारणास्तव, तो कोणाशीही संपर्क साधू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्याची सुटका केली.

त्यानंतर पोलिसांनी माहिती दिली की एक व्यक्ती धबधब्यात पडली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. एंटी-कोरोनाव्हायरस नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला. मात्र, अद्याप त्याचे नाव जाहीर झाले नाही. जेव्हा ती व्यक्ती शुद्धीत आली, तेव्हा त्याला १२० युरो म्हणजे सुमारे ११,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्याला घरीच राहण्याचे निर्देश देऊन सोडले. फ्रान्सपेक्षा स्पेनमध्ये गोष्टी स्वस्त मिळतात.

विशेष म्हणजे जगभरात कोरोना विषाणूमुळे बर्‍याच देशांनी आपल्या सीमांना सील केले आणि लॉकडाऊन जाहीर केल. फ्रान्स आणि स्पेनमध्ये देखील लॉकडाउन आहे, परंतु आवश्यक वस्तू येथे उपलब्ध केल्या जात आहेत. असे असूनही फ्रेंच लोक स्पेनमध्ये सिगारेट, मद्यपान, खाद्यपदार्थ व इंधन खरेदी करण्यासाठी येतात कारण फ्रान्सपेक्षा स्पेनमध्ये या वस्तू स्वस्त आहेत. दोन्ही देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे हजारो लोक मरण पावले आहेत.

सर्वात वाईट इटलीची परिस्थिती आहे. इटलीमध्ये १७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर फ्रान्समधील मृतांची संख्या ही दहा हजारांच्या पुढे गेली आहे. लॉकडाऊन असूनही, लोकांना व्यायामासाठी, खरेदीसाठी किंवा कामासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु योग्य कागदपत्रे न घेता पकडलेल्यांकडून एकूण ५० दशलक्ष युरो दंड वसूल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Cigarettes Increase MRSA Drug Resistance