जुळे असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने भावाच्याच पत्नीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

physical abuse
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – दिवसेंदिवस अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यात जुळे असल्याचा फायदा घेत आपल्याच भावाच्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. लातूर जिल्ह्यात जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने भावाच्याच पत्नीवर अत्याचार (physical abuse) केले आहेत. ही घटना लातुरातील रिंगरोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित महिलेच्या पतीला आणि दिराला अटक करण्यात आली आहे.

सहा महिन्यांनी उघडकीस आला प्रकार
दोन जुळ्या भावातील एकाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. या दोन्ही जुळ्या भावांमध्ये खूपच साम्य होते. त्यामुळे घरातील नवविवाहित मुलीला आपला नवरा आणि दीर कोण आहे यातील फरकच समजला नाही. याचाच फायदा घेत आरोपी दिराने आपल्या वाहिनीवरच अत्याचार (physical abuse) केले आहेत. धक्कादायक म्हणजे सहा महिन्यांनी पीडितेला हा प्रकार समजला. तोपर्यंत तिला याची कल्पनादेखील नव्हती.

पीडितेचा नांदायला नकार
पीडित तरुणी माहेरी गेली होती. यावेळी तिचा जुळा दीर घ्यायला गेला असता तिने सासरी जाण्यास नकार दिला. यानंतर तिला तिच्या आई वडिलांनी सासरी नांदायला न जाण्याचे कारण विचारले असता तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. हे सगळे ऐकून तिच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. याप्रकरणी पोलिसांनी पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित महिलेच्या पतीला आणि दिराला अटक करण्यात आली आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल