सातारा | सातारा जिल्हा युवक काँग्रेस व विधानसभा कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात अध्यक्षपदी खटावचे अमरजित कांबळे हे 6 हजार 234 मते मिळवून तर कार्याध्यक्षपदी कराडचे अमित जाधव हे 16 हजार 895 मते मिळवून विजयी झाले. अध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे अमरजित कांबळे याची अध्यक्षपदी तर अमित जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली. सदरच्या निवडणुका ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व युवक कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सन 2010 पासून विद्यार्थी काँग्रेस (एन.एस.यु.आय) व युवक काँग्रेस मध्ये सर्वसामान्य लोकांना पदे मिळावीत व नवीन नेतृत्व घडवण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून दर 3 वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकीत जिल्हा कार्यकारिणीसाठी एकूण 24 उमेदवार उभे होते. मिळालेल्या मतांनुसार प्राधान्यक्रमाने इतर उमेदवार हे उपाध्यक्ष, सरचिटणीस,चिटणीस म्हणून विजयी झाले आहेत. सदर जिल्हा कार्यकारिणीत महिला, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक ई. प्रवर्गांना आरक्षण दिले गेले होते.
जिल्हा कार्यकारिणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील 18 ते 35 या वयोगटातील एकूण 62 हजार 345 युवकांनी मतदान केले होते. त्यापैकी 50 हजार 634 मते वैध ठरली. इतर मतदारांची मते आधारकार्ड, फोटो यामध्ये त्रुटी असल्याने अवैध ठरली. जिल्हा कार्यकारिणीसोबतच विधानसभा मतदारसंघनिहाय निवडी जाहीर झाल्या आहेत.
जिल्हा कार्यकारिणी अशी असेल – अध्यक्ष -अमरजित कांबळे , कार्याध्यक्ष – अमित जाधव,
महिला उपाध्यक्षा – सौ.निलम येडगे, उपाध्यक्ष – विहार पावस्कर, सागर सावंत, समीर पटवेकर, सरचिटणीसपदी – प्रशांत पवार ,गंगाराम रणदिवे, प्राची ताकतोडे, प्रमोद माने, अभिजित चव्हाण, देवदास माने, रोहित पाटील, प्रेरणा काशीद, अमोल नलवडे, सुरज कीर्तिकर , सचिवपदी- अजित पवार, राहुल फडतरे, सचिन घाडगे, दिग्विजय वाघमारे, राहुल रासकर, सचिन गोरड, महेश देसाई, जयेश चव्हाण आदी विजयी झाले आहेत.
विधानसभा निहाय निवडी खालीलप्रमाणे –
कराड दक्षिण – दिग्विजय पाटील (अध्यक्ष), राम मोहिते (उपाध्यक्ष)
कराड उत्तर – सुरज पवार ( अध्यक्ष ) , प्रवीण वेताळ ( कार्याध्यक्ष)
पाटण – नरेंद्र पाटणकर (अध्यक्ष), प्रथमेश पाटील (उपाध्यक्ष)
सातारा – विक्रांतसिंह चव्हाण ( अध्यक्ष ), अमोल शिंदे व सुयोग गोरे (उपाध्यक्ष)
कोरेगाव – दत्तात्रय भोसले (अध्यक्ष), सागर साळुंखे (उपाध्यक्ष)
माण-खटाव – ॲड.संदीप सजगणे (अध्यक्ष), पंकज पोळ (उपाध्यक्ष)
वाई – सचिन काटे (अध्यक्ष), ऋषिकेष धायगुडे-पाटील (उपाध्यक्ष)
फलटण – अजिंक्य कदम ( अध्यक्ष ).
आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव,युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मावळते जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जि. प. सदस्य ॲड. उदयसिंह पाटील, निवासराव थोरात, हिंदुराव पाटील, महेंद्र बेडके, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, दयानंद भोसले, महिला अध्यक्षा सौ.अल्पना यादव आदींनी अभिनंदन केले.