30 रुपये मागितल्याचा राग मनात धरून मित्रानेच केला मित्राचा खून

Arun
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील मुचंडी या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ३० रुपये मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा त्याच्याच मित्राने गळा दाबून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव अरुण शामू मलमे आहे. मृत अरुण याच्या वडिलांनी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून संशयीत आरोपी रमेश फकीराप्पा पाटोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
मुचंडी गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या तोळबळवाडी या गावात अरुण मलमे आणि रमेश पाटोळे हे दोघे मित्र राहत होते. मंगळवारी रात्री ७ वाजता संशयित रमेश पाटोळे हा अरुणला ३० रुपये देण्यासाठी गेला होता त्यावेळी त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढे वाढले कि रमेशने अरुणचा गळा धरून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला ढकलून दिले.

एवढ्यावरच तो थांबला नाही तर अरुण खाली पडल्यानंतर रमेशने त्याच्या छातीवर बसून अरुणला जखमी केले. यामध्ये अरुणचा मृत्यू झाला. यानंतर रमेश घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सध्या आरोपी फरार आहे. जत पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.