कुत्र्याला फुगे बांधून त्याला हवेत उडवले, पोलिसांकडून युट्यूबरला अटक

Air Baloons Dog
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. आजकाल लोक प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडियाचा फायदा घेतात. अनेकजण सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करतात तर काहीजण याचा उपयोग चुकीच्या कामासाठी करतात. अशा प्रकारे आपण झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काहीतरी गुन्हा करून बसतो हे अनेकांच्या लक्षात देखील येत नाही. दक्षिण दिल्लीमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. यामध्ये एका युट्यूबरने युट्यूबला व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी एका श्वानाला त्रास दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याने कुत्र्याला त्रास दिल्याची तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी युट्यूबरला अटक केली आहे.

काय आहे प्रकार
गौरव शर्मा या 32 वर्षीय तरुणाने एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने हेलियमच्या फुग्यांना एका पाळीव कुत्र्याला बांधले होते. फुगे हवेत सोडल्यानंतर कुत्रा देखील हवेत उडू लागला होता आणि त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता अशी तक्रार पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स सोसायटी या संस्थेच्या गौरव गुप्ता यांनी मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 21 मे रोजी शूट करण्यात आला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर गौरव गुप्ता यांनी हि तक्रार नोंदवली आहे.

सोशल मीडियावर या तरुणाविरोधात उमटल्या प्रतिक्रिया
पी.एस. मालवीय नगर याठिकाणी या तरुणाविरोधात भादवी कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 11 (1) (ए) आणि कलम 11 (1) (डी) पशु क्रूरता प्रतिबंधक कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गौरव शर्मा मालवीय नगरमधीलच पंचशील विहार याठिकाणचा रहिवासी आहे. तो एक युट्यूबर असल्याने त्याने हा व्हिडिओ बनवला होता असे त्याने आपल्या जबाबात म्हंटले आहे.