पुणे प्रतिनिधी | सर्वसामान्य परिस्थिती असो वा कठीण परिस्थिती रिक्षावाले काका कायम सर्वसामान्य माणसांच्या मदतीला धावत असतात. ऊन असो वा पावसाळा ते कायम लोकांना आपल्याला कायम वेळेत इच्छित स्थळी पोहोचवत असतात. सध्या कोरोनाच्या कठीण प्रसंगात रिक्षावाल्या काकांची रिक्षा थांबली आहे. सामान्य नागरिकांसह आर्थिक समस्येला या वर्गालासुद्धा मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. ‘रिक्षावाले काका’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील ‘युवा स्पंदन संस्था’ मदतीला धावून आली आहे. पुण्यात स्पंदनकडे नोंदणी केलेल्या शंभरहुन अधिक रिक्षाचालकांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
या कठीण प्रसंगी रिक्षावाल्या काकांच्या मदतीला धावून जाणं हाच महाराष्ट्रधर्म मानून युवा स्पंदनने हा उपक्रम काही दिवसांपूर्वी सुरू केला आहे. येणाऱ्या काळात अजून काही रिक्षावाल्या काकांच्या खात्यात मदत जमा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं चेतन धोत्रे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून सधन नागरिकांनी ऐच्छिक मदत करावी असं मत धोत्रे यांनी व्यक्त केलं आहे.
अधिक सहकार्यासाठी चेतन धोत्रे 9881288558 आणि प्रशांत पाटील 9637480757 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.