औरंगाबाद | जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थ समितीचे सभापती किशोर गलांडे यांनी हा अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्वसाधारण सभा ऑनलाइन पध्दतीने अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे 2020 आणि 2021 चे सुधारित आणि 2021, 2022 च्या मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला आज मान्यता देण्यात आली राज्य शासनाकडून वर्ग करण्यात आलेले पदे तसेच जिल्हा परिषदेने स्वतःच्या उत्पादनातून निर्माण केलेली पदे चालू ठेवणे अंगणवाडीसाठी जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करण्यासाठी या योजनेसाठीही मान्यता या सभेमध्ये घेण्यात आली.
ऑक्टोबर 2015 मध्ये
च्या पाहणीसाठी आलेल्या पंचायतराज समितीच्या स्वागत समारंभासाठी खर्च करण्यात आलेल्या विषयालाही बऱ्याच सदस्यांनी विरोध केला होता. पाच वर्षानंतर आज झालेल्या या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय आला. ही सभा ऑनलाईन असल्याने ग्रामीण भागातील सदस्यांना मात्र मोठी अडचण निर्माण झाली होती, नेमका अर्थसंकल्प कसा आणि कोणत्या विभागाला किती निधी यांचा कोणताही ताळमेळ या सदस्यांना बसला नाही. या सभेला विषय समितीचे सभापती उपाध्यक्ष यांच्यासह ऑनलाईन सदस्यांची उपस्थिती होती.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा