पंजाब पोलिस आणि शेतकऱ्यांमधील संघर्षाचा व्हिडिओ व्हायरल; एक सरदार पडला पोलिसांवर भारी

lathi charge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये पंजाब पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष: पाहायला मिळत आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एकच सरदार संपूर्ण पोलिसांच्या ताफ्यावर चालून जाताना दिसतो. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील झिरामध्ये दारू कारखान्याबाहेर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू आहे. यावेळी पोलिसांनी घेराव घातल्याने आंदोलन करणारे शेतकरी संतप्त झाले. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार (lathi charge) करण्यास सुरुवात केली. याचे प्रत्युत्तर म्हणून एका सरदाराने लाठीचार्ज करून संपूर्ण पोलिस ताफ्याला पळून जाण्यास भाग पाडले. या सरदाराचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
फिरोजपूर जिल्ह्यातील मन्सूरवाल गावात दारूच्या कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्लांटमुळे प्रदूषण पसरण्याबरोबरच परिसरातील अनेक गावांतील भूगर्भातील पाणीही प्रदूषित होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. ते बंद करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी जवळपास पाच महिन्यांपासून येथे धरणे आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरु असताना आंदोलनस्थळी पोलिसांनी घेराव घातल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांवर लाठीमार (lathi charge) केला.

यानंतर संतप्त शेतकरी प्रत्युत्तर म्हणून पोलिसांवर लाठीचार्ज (lathi charge) करतात. यादरम्यान एक सरदार पोलिसांच्या मधोमध येतो आणि पोलिसांवर तुटून पडतो. सरदारजींचा रौद्र रूप पाहून पोलिस तिथून पळून जातात. सरदार संपूर्ण पोलिस पलटणचा लांबपर्यंत पाठलाग करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या सरदारजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल