Wednesday, March 29, 2023

सचिनच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पोलिसांनी दिला नागरिकांना ‘स्ट्रेट ड्राईव्ह’चा सल्ला

- Advertisement -

#HappyBirthdaySachin । आपल्या फलंदाजीतून अनेकांना आनंद देणाऱ्या, क्रिकेटला नवी कलाटणी देणाऱ्या, क्रिकेटमधील अनेक विक्रम नावावर असणाऱ्या, विश्वात चाहत्यांनी देवाची पदवी बहाल केलेल्या लाडक्या सचिनचा आज वाढदिवस. आज जगभरातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलिसांनीदेखील सचिनला आज शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्र पोलिसांनी सचिनला ‘टन’भर शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र पोलिसांनी सचिनला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना राज्यातील नागरिकांनाही खास संदेश दिला आहे. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन न करता घरीच थांबा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. “सचिनच्या ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ ने अनेकदा भारताला जिंकवलंय! आता तुमची पाळी आहे. विनाकारण बाहेर फिरत असाल तर स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा. ही ‘टेस्ट’ भारतच जिंकणार! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या ‘टन’ भर शुभेच्छा! #Sachinbirthday”, असे ट्विट केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, यंदा देशात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि खडतर काळात यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सचिनने घेतला आहे. सचिनच्या जवळच्या मित्राने याविषयी माहिती दिली. “ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी करोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत. अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे”, असे सचिनच्या मित्राने सांगितलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला “HelloNews”.