आमदार त्रिपाठींवर पत्नीचा खून केल्याचा आरोप; प्रेयसीचा मर्डर केल्याप्रकरणी वडीलही तुरुंगात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील महाराजगंजच्या नौतनवा सीटवरील अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांना पोलिसांनी त्यांच्या सात समर्थकांसह अटक केली आहे. त्याला बिजनौर जिल्ह्यात अटक करण्यात आली. सीएम योगी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी अमनमणि विरोधात साथीच्या आजार अधिनियम यासह आयपीसीच्या विविध कलमांतर्गत कारवाई केली आहे. लॉकडाऊन दरम्यान अमनमणि डोंगरावर फिरायला निघाला होता.त्याची एक क्लिप नुकतीच व्हायरल होत आहे,ज्यामध्ये तो हिमवृष्टीबद्दलही विचारत आहे.अमनमणि त्रिपाठी हे आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

बद्रीनाथ, केदारनाथला ११ जणांच्या ताफ्यासह जात होते
लोकडाऊन दरम्यान अमनमणि ११ जणांचा ताफा घेऊन देहरादूनहून बद्रीनाथ तसेच केदारनाथला जात होता.जाताना रविवारी रात्री त्याला चामोली सीमेवर अडविण्यात आले, पण नंतर त्याला यूपी सीमेवर सोडण्यात आले. बिजनौर येथे सोमवारी अमनमणिसह सात जणांना अटक करण्यात आली. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिजनौरचे एसपी म्हणाले की, यूपी सरकारने अमनमणिला उत्तराखंडला जाऊ दिले नाही. तो अनावश्यकपणे बाहेर होता तसेच त्यांच्याकडे वैध पासही नव्हता. या लोकांना क्वारंटाईन ठेवणे आणि त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. या लोकांवर कारवाईही केली जाईल.

 

पिता अमरमणि याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
बाहुबली मंत्री असलेले अमरमणि त्रिपाठी यांचे पुत्र अमनमणि त्रिपाठी वडिलांच्या राजकीय वारशामुळे विधानसभेच्या उंबरठ्यावर पोचले होते अमनमणि त्रिपाठी हा त्याचे वडील अमरमणि त्रिपाठी यांच्या पाउलांवर पाऊल ठेवून वाटचाल करीत आहे. मधुमिता खून प्रकरणात त्याचे वडील जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, तसेच त्याच्या कारनामांमुळे मुलालाही अटक करण्यात आली आहे. लखनौच्या लेखिका मधुमिता शुक्ला यांच्या हत्येचा आरोप त्याचे पिता अमरमणिवर आहे.

पत्नी साराच्या हत्येचा आरोप अमनमणि त्रिपाठीवर
आमदार अमनमणि त्रिपाठी याच्यावरही आपली पत्नी सारासिंगची हत्या केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर हा गुन्हा लपवण्यासाठी अमनमणिने तो एक अपघात असल्यासारखे दाखविल्याचा आरोप आहे.एका कार अपघातात अमनमणि त्रिपाठीची पत्नी साराच्या मृत्यूची घटना तिची आई सीमा सिंह यांनी केली होती. यानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली आणि त्याला अटक करण्यात आली. सध्या त्याची जामिनावर सुटका झाली आहे,पण खटला चालू आहे. वडील अमरमणि यांना आपल्या मैत्रिणीच्या हत्येबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे, तर मुलगा अमनमणि त्रिपाठी याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतरही हे बाहुबली त्रिपाठी कुटूंबियांच्या राजकीय कारकिर्दीवर याचा काही परिणाम झालेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment