हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक फोटो सध्या शेअर केले जात आहे, ज्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री पंतप्रधान मोदींच्या आसपास सुरक्षित अंतरावर बसलेले दिसत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यांनी लिहिले- आज सोशल डिस्टन्सिंग ही काळाची गरज आहे. आम्ही ती पाळतआहोत … आपण हे करत आहात का? “
Social distancing is need of the hour. We are ensuring it… Are you?
Picture from today’s cabinet meeting chaired by Hon’ble PM @narendramodi ji.#IndiaFightsCorona pic.twitter.com/Lr76lBgQoa
— Amit Shah (@AmitShah) March 25, 2020
“कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबविण्याचा सोशल डिस्टन्सिंग हा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग आहे. बर्याच लोकांना असे वाटते की सोशल डिस्टन्सिंग केवळ कोरोनाच्या रूग्णांसाठी आहे. हे चुकीचे आहे. सोशल डिस्टन्सिंग प्रत्येकासाठी आहे. अगदी पंतप्रधानांसाठीही. ” असं पंतप्रधान मोदींनी मंगळवारी देशाला संबोधित करतांना सागितलं होत. त्याचाच प्रत्यय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळाला.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.