कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव म्हणजे वर्षभर सळसळती ऊर्जा देणारा आनंद सोहळाच असतो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अगदी परदेशात जरी कोणी गेले असेल तरी प्रत्येक कोल्हापूरकर गणेशोत्सवासाठी हजेरी लावतोच, पण यंदा कोल्हापूरला महापूरान विळखा घातल्याने कोल्हापूरचे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणान साजरा करायचा असे कोल्हापूरकरांनी ठरवले आहे.
महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त केले. सोबतच जिल्ह्यातील लहान मोठया उद्योजकांचे ही मोठे नुकसान झाले. याचा परिणाम आता शहरात जाणवायला सुरवात झाली आहे. याचा पहिला फटका बसलाय तो येऊ घातलेल्या गणेशोत्सवाला खरतर हा मांगल्याचा आणि उत्साहाचा सण मात्र गणेशमूर्ती पुराच्या पाण्यामध्ये गेल्यान हा सण साधेपणान साजरा करायचा असला तरी मुर्त्यांविना कसा साजरा करायचा हा मोठा आणि गहन प्रश्न तरुण मंडळासमोर उभा राहिला आहे.
तरीही आता आपली परंपरा म्हणून काही मंडळ छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत, तर काही मंडळांनी जमा होणाऱ्या वर्गणीतून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भव्य मिरवणुकांना बहुतांश मंडळ फाटा देणार असून, देखाव्यांच्या माध्यमातून महापुरावरच प्रबोधनाचा निर्णयही काही मंडळांनी घेतला आहे. मंगळवार पेठेतील दीडशेहून अधिक तालीम व तरुण मंडळांनी २ दिवसांपूर्वी बैठक घेऊन पहिल पाऊल उचलल. प्रत्येक मंडळान पूरग्रस्तांना २१ हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा –
गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर
गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवणारी ‘चौथी पिढी’
या तारखेला राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक करणार भाजपमध्ये प्रवेश