खा. उदयनराजे भोसले आणि राजु शेट्टी बैठक संपन्न

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ‘विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जावु नका’ अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांना केली. राजू शेट्टी हे खा. उद्यनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी सातारा इथं गेले असता चर्चेदरम्यान शेट्टी यांनी उदयनराजेंना ही विनंती केली.

याबाबत बोलत असताना उदयनराजे म्हणाले की, ‘भाजपात प्रवेश करायचा की नाही. हा निर्णय मी अजून घेतला नाही’ असं उदयनराजे यांनी यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान सांगितल्याचं राजु शेट्टी म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अजूनही काहींचा प्रवेश सुरु आहे. त्यातच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना भाजपात प्रवेश न करण्याची विनंती केली आहे.