नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी आज विधान परिषेदेत ‘..तर मी आत्महत्या करेन’ असे विधान केल्याने सभागृहात एकच गदारोळ उठला. सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकाला गुजराती भाषेतील पाने जोडली गेल्याचा आरोप तटकरे यांनी सत्ताधारी भाजपवर केला होता. परंतु चंद्रकांत पाटलांनी तो फेटाळून लावला. त्यावर बोलताना ‘मी सरकारवर केलेला आरोप खोटा निघाला तर मी विधान परिषदेच्या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन’ तटकरेंनी असे विधान केले.
सुनिल तटकरेंनी सभागृहात सरकारला आत्हत्येची धमकी देताच विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. सभागृहात गदारोळ वाढत गेल्याने सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.