थोरतांच्या बालकिल्यात विखेंचा सुरुंग

छायाचित्र छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सतत याना त्या कारणाने चर्तेत असतेच. त्यात विखे अन थोरातांचा वाद तर उभा महाराष्ट्राला माहित आहे. दोघेही एकाच पक्षात होते तोपर्यंत पक्षांतर्गत राजकारण चांगलेच रंगत होते. परंतु आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकतेच भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा कॉग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत बाळासाहेब थोरतांच्या बालकिल्यात विखेंनी सुरुंग लावला आहे.

संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे काँग्रेसचे उपसभापती थोरतांच्या जवळचे निकटवर्तीय सतिश कानवडे यांचा राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश झाला असून हा प्रवेश नक्कीच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या डोकेदुखीत वाढ करनारा आहे.

आज संगमनेर मधील मालपानी हेलथ येथे कॉग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती सतिश कानवडे यांनी भाजपची वाट पकडली असुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रशवभूमीवर हा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदार संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विखेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर संगमनेर मध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी विखे पिता पुत्र चांगलेच कमला लागले असून. त्यामुळेच हा एक मोठा मासा त्यांच्या गळाला लागला असल्याचे बोलले जात आहे.