देशामध्ये अराजकता माजवण्याचा RSS, भाजपचा कट – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : NRC, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि NPR च्या माध्यमातून देशामध्ये अराजकता माजवण्याचा कट RSS, भाजपच्या सरकारने रचला असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा व NRC च्या विरोधात दादरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. तेव्हा झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगी शिवाय अमित शहा यांनी NRC विषयी विधाने केली असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांचा राजीनामा मागणार का असा सवाल प्रकाश प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

बाप कुठं मेला हे ज्यांना माहीत नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं मागता काय

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC हे मुस्लिमांच्या विरोधात तर आहेच त्याचबरोबर हा कायदा ४०% हिंदूंच्याही विरोधात आहे. भारतातील भटकी जनता आजही डिटेन्शन कॅम्पमध्येच जगत आली आहे. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत. बाप कुठं मेला, आजोबा कुठं मेला, हेही अनेकांना माहीत नाही. त्यांच्याकडून नागरिकत्वाचे पुरावे मागता काय, अअसा सवाल उपस्थित करून डिटेक्शन कॅम्पमध्ये जायचे नसेल तर हे सरकार पाडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.