मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याचे कारण सांगत शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हाण दिले आहे.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत एकुण चार पक्षकार असून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सुद्धा पक्षकार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत.