कोल्हापूर प्रतिनिधी | राज्य बँकेत झालेल्या घोटाळा केल्याच्या आरोपावरून राजकीय नेत्यांसह 76 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केलेल्यां मध्ये अजित पवारांसह दिग्गज नेत्यांची नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेमध्ये उडी घेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, ‘राज्य बँकेत सकृतदर्शनी कोणताही गैरप्रकार झालेला दिसत नाही असं सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. तसेच बँकेच्या तत्कालीन संचालकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्य सकृतदर्शनी कोणताही गैरप्रकार दिसत नाही. या गुन्ह्यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल. गुन्हा दाखल झाला याचा अर्थ आरोप सिद्ध झाला असं होत नाही.’ शेट्टी कोल्हापुरात बोलत होते. ‘प्रामाणिकपणाने आणि निपक्षपातीपणाने तपास यंत्रणांनी या गुन्ह्याचा तपास करावा तसेच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल’ असेही ते म्हणाले.
दरम्यान महापुरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी आणि शासनाने नुकसान भरपाईचा काढलेल्या फसव्या आदेशा विरोधात तसेच पीक विमा संदर्भात देखील फसवणूक करण्यात आल्याचे सांगून राजू शेट्टी यांनी ‘जन आक्रोश मोर्चा ‘चे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असून मोर्चाला मोठ्या संख्येने लोक तसेच शेतकरी सामील होणार आहेत. तेव्हा या ‘जन आक्रोश’ मोर्च्याकडे सरकार कशा पद्धतीने लक्ष देत आहे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.