शिवसेनेकडून जिल्ह्यातील आठ विधानसभेसाठी मुलाखती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरु आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली असताना जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत पार पडल्या. मात्र या मुलाखतीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त मुंबईतील शिवसेना भवनमध्ये समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, खा. श्रीकांत शिंदे, आ. प्रकाश हातरतेकर, आ. मनिषा कायंदे, अमोल किर्तीकर, उपनेते विजय कदम यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातून प्रत्येक मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

केंद्र आणि राज्यात भाजप-सेनेची युती आहे. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते दाखल होत आहेत. इनकमिंग वाढल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सेनेकडूनही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली असल्याचे स्पष्ट झाले. सांगली विधानसभेसाठी शेखर माने, दिगंबर जाधव, बजरंग पाटील, शंभुराज काटकर, जत विधानसभेसाठी संजय सावंत, अंकुश हुवाळे, दिनकर पतंगे, तासगाव-कवठेमंकाळसाठी दिनकर पाटील, साहेबराव पाटील, छायाताई खरमाटे, सुनीता मोरे, अमोल काळे, भाऊसाहेब कोळेकर.

पलूस-कडेगाव मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख संजय विभूते, सुभाष मोहिते ,जितेंद्र भोसले, विनायक गोंडील, दत्ता माने, इस्लामपूर विधानसभेसाठी आनंदराव पवार, शकील सय्यद, वीर कुदळे, युवराज निकम, शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये तालुका प्रमुख संतोष हिरगुडे, नंदकुमार नीळकंठ खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय विभुते यांनी मुलाखती दिल्या.