हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : ऑक्टोबर महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आता उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना भरपूर सुट्ट्या मिळाल्या होत्या. आता, नोव्हेंबरमध्ये बँकांना फक्त 10 बँक सुट्ट्या असतील. यामुळे जर पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्याचा प्लॅन बनवला असेल तर सुट्ट्यांची लिस्ट पहा.
हे लक्षात घ्या कि, RBI कडून बँकांच्या सुट्ट्या ठरवल्या जातात. RBI कडून प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी सुट्ट्यांची लिस्ट तयार केली जाते. नोव्हेंबर मध्ये देशभरात एकत्रितपणे 10 दिवस बँका बंद राहणार नाहीत. आरबीआयने सुट्ट्यांची जी लिस्ट जाहीर केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय पातळीवरील आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सर्व्हिसेस बंद राहतील. तसेच, यातील काही सुट्ट्या या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावरील आहेत. त्या दिवसात बँकेच्या शाखा फक्त त्याच्याशी जोडलेल्या राज्यांमध्येच बंद राहतील. Bank Holiday
ऑनलाइन सर्व्हिसेस सुरू राहतील
आजकाल जवळपास सर्वच बँकांकडून ऑनलाइन सेवा दिली जात आहे. याचा ग्राहकांना खूप फायदा होतो. मात्र, अजूनही अशी काही कामे आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागेल. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या सुट्ट्यांची माहिती ठेवावी जेणेकरुन कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास ते सुट्टीच्या दिवसापूर्वीच करता येईल. Bank Holiday
नोव्हेंबर 2022 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट (Bank Holiday)
नोव्हेंबर 1 – कन्नड राज्योत्सव आणि कुट मुळे बेंगळुरू आणि इंफाळमध्ये बँक सुट्टी असेल.
6 नोव्हेंबर – रविवारमुळे बँका बंद राहतील.
८ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा आणि वांगला उत्सव साजरा केला जाईल, त्यामुळे बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये वांगला उत्सव आणि कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
12 नोव्हेंबर – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद राहतील.
13 नोव्हेंबर – रविवार असल्यामुळे सुट्टी आहे.
20 नोव्हेंबर – रविवार साप्ताहिक सुट्टी आहे.
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नेम सणानिमित्त शिलाँगमध्ये बँकेला सुट्टी असेल.
26 नोव्हेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
27 नोव्हेंबर – रविवार आहे आणि त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. Bank Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज