बिहारमध्येही मोठी दुर्घटना! धावता ट्रक गर्दीत घुसल्याने भीषण अपघात; 12 जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बिहारमध्ये रविवारी भरधाव ट्रक गर्दीत घुसल्याने एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये 12 जण ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. वैशाली जिल्ह्यातील मेहनार गावामध्ये हि दुर्घटना घडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची (accident) दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे तसेच जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

या दुर्घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले आहेत तसेच जखमींना योग्य उपचार देण्याची सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही ट्वीट करत दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना आदरांजली वाहिली आहे.

बिहारमधील वैशाली येथे झालेल्या अपघातात (accident) लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करते असे ट्विट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी ट्रकचा चालक आणि हेल्पर या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. या दोघांच्या वैद्यकीय तपासणीनंतर चालकाने मद्यप्राशन केलं होतं का याची माहिती मिळेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?