UPI पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणूकीला कसे टाळावे हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारखी UPI पेमेंट अ‍ॅप्स देखील वापरता का? हे टूल्स आपल्या ट्रान्सझॅक्शन पद्धतींमध्ये नक्कीच सोयी देतात, मात्र त्यांचे काही तोटे देखील आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. काही सोप्या टिप्स वापरून, तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता, जसे की रॅन्डम लिंक्सवर क्लिक न करणे, फ्रॉड कॉल्सना उत्तर न देणे आणि पिन नंबर, पासवर्ड यासारखे महत्त्वाचे ट्रान्सझॅक्शन डिटेल्स कोणाशीही शेअर न करणे.

येथे आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही UPI ट्रान्सझॅक्शन करताना त्यांना सुरक्षित ठेवू शकता. या टिप्स स्वीकारल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचू शकता.

पिन कोणाशीही शेअर करू नका
हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमचा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नये, मग तो तुमचा मित्र असो, कुटुंबातील सदस्य असो किंवा आणखी विश्वासू असो. तुम्ही तुमचा पिन कोणाशीही शेअर करता तेव्हा फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तुमचा पिन कुणाला सापडला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तो ताबडतोब बदलायला हवा.

चांगला पासवर्ड वापरा
चांगला पासवर्ड ठेवून तुम्ही प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे संरक्षण करू शकता. तुम्ही फक्त तुमच्या हार्डवेअरवर लॉक ठेवू नये, तर तुम्ही पेमेंट अ‍ॅप्सना देखील चांगल्या पासवर्डसह संरक्षित केले पाहिजे. सामान्यतः असे दिसून येते की लोकं त्यांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादीसारखे पासवर्ड अगदी सहज ठेवतात. हे पासवर्ड खूपच कमकुवत असतात आणि ते अगदी सहजपणे हॅक देखील केले जाऊ शकतात. म्हणूनच असे पासवर्ड ठेवणे टाळावे. तुमचा पासवर्ड हा नेहमी लेटर्स, नंबर्स, स्पेशल कॅरेक्टर्सचा कॉम्बिनेशन असावा.

अनव्हेरीफाइड लिंकवर क्लिक करू नका
आपल्या सर्वांना अनेकदा अनव्हेरीफाइड अकाउंट्स किंवा फोन नंबरवरून मेसेज मिळतात. या मेसेजमध्ये अशा अनेक लिंक्स असतात, ज्यावर क्लिक करण्याचा मोह तुम्हाला होतो.हे गरजेचे नाही की तुम्हालाच s.m.s मिळावा. होय, तुम्हाला काही ई-मेल्स देखील मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे – दुर्लक्ष करा. दुर्लक्ष करा आणि डिलीट करा. अशा लिंक्सवर क्लिक करणारी लोकं फसवणुकीला बळी पडतात आणि अशा बातम्या आपण रोज बघतो आणि वाचतो.

फक्त ट्रस्टेड आणि व्हेरीफाइड पेमेंट अ‍ॅप्स ठेवा
तुमचे ट्रान्सझॅक्शन अगदी साधे ठेवावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचा अर्थ जास्त पेमेंट अ‍ॅप्स न ठेवता फक्त एकच पेमेंट अ‍ॅप ठेवावे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही पेमेंट अ‍ॅप ठेवा, ते ट्रस्टेड आणि व्हेरीफाइड असले पाहिजे. PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी ट्रस्टेड अ‍ॅप्स आहेत.

Leave a Comment