कामाच्या श्रेयवादावरून शिंदे गटाचे समर्थक भररस्त्यावर एकमेकांबरोबर भिडले

Fight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील उल्हासनगर या ठिकाणी कामाच्या श्रेयवादावरून शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठी खडाजंगी (Fight) पाहायला मिळाली. यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांना अक्षरश: लाठ्या काठ्याने मारहाण (Fight) केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्हासनगर जवळील एसएसटी कॉलेज समोर हा राडा (Fight) पाहायला मिळाला.

काय घडले नेमके?
व्हीनस चौक ते श्रीराम चौक असा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या श्रेयावरून शिंदे गटातील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचा पती वसंत भोईर आणि युवसेना संपर्क प्रमुख विजय जोशी यांच्यात वाद होता. आज हे दोन्ही गट रस्त्याच्या कामाच्या पाहणीच्या निमित्ताने एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात वाद (Fight) झाला.

सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली मात्र यानंतर हा वाद एवढा वाढला कि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी (Fight) झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत. या मारहाणीचा (Fight) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विठ्ठलवाडी पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या