दिल्लीतील 200 पोलिसांचे एकत्रित राजीनामे! काय आहे सत्य?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | शेतकरी आंदोलनानंतर एकाच वेळी 200 पोलिसांनी राजीनामे दिले असून ते सुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याची एक बातमी सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातमीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. यामागची सत्यता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘हॅलो महाराष्ट्र’ने केला आहे. जाणून घेऊ काय आहे सत्य.

26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलकांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली मोठया प्रमाणात हिंसक वळण घेऊन गेली. शेतकऱ्यांनी लाल महालावरती आपला झेंडासुद्धा फडकवला. यामधे पोलिस आणि आंदोलक यांची हातापाई झाली. आंदोलक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर 200 पोलिसांनी एकत्रित राजीनामे दिले अशी बातमी मोठ्या प्रमाणावर सामाजिक माध्यमावर पाठवली गेली. ती बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारच्या PIB वेबसाईट वरती ही बातमी पडताळून पहिली असता ही बातमी खोटी असल्याचे समजून आले. PIB वेबसाईटने त्यांच्या ऑफिसियल ट्विटर अकाऊंटवर या बातमीची माहिती दिली आहे. यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.