चाकरमान्यांसाठी खुशखबर!!! एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर आहे. यंदाच्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून 2310 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या २ वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा निर्णय घेत गणेश भक्तांना खुश केलं आहे.

25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून 1268 बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी 872 बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून 667, पालघर विभागातून 313 आणि ठाणे विभागातून 288 बसेस असणार आहेत. अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा घटना घडल्यास अथवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात 100 अतिरिक्त गाड्यांचं नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.

त्याशिवाय, अतिवृष्टीमुळे कोकणातील खराब झालेल्या रस्त्यांमुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे एसटी महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये 10 अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच गणेशोत्सवानंतर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबईसाठीच्या अधिक बस सोडण्यात येणार आहेत.

जादा बसेस असणारे बसस्थानके आणि वाहतूकीचे ठिकाणे

परळ आगार : सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरी
ठाणे 1 आगार: भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी, संकल्प सिद्धी गणेश मंदीर (बोरिवली)
ठाणे 2 आगार: भांडूप (पश्चिम) व (पूर्व), मुलुंड (पूर्व)
मुंबई सेंट्रल आगार : मुंबई सेंट्रल साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफ परेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी
कल्याण आगार: कल्याण डोंबिवली (पश्चिम) व (पूर्व)
नालासोपारा आगार: नालासोपारा
पनवेल आगार : पनवेल आगार
वसई आगार: वसई आगार