वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा शहरातील स्टेशनफैल परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण वर्धा शहर हादरलं आहे. यामध्ये वडिलांशी वाद का घातला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या 27 वर्षीय युवकाला दगडाने ठेचून मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या ( Murder) केली. या प्रकरणी आरोपी बाप लेकासह त्याच्या मावस भावाला अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
आशिष आनंद रणधीर असे 27 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात शुभम जयस्वाल, त्याचे वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल आणि आदित्य जयस्वाल यांना अटक केली आहे. मृत आशिष रणधीर आणि आरोपी शुभम जयस्वाल हे दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असून अगदी काही अंतरावर दोघांचेही घरं आहेत. मृत आशिषचे वडील आनंद रणधीर यांचा 31 मे रोजी सकाळच्या सुमारास आरोपी शुभम जयस्वाल याच्याशी वाद झाला होता. यामध्ये मृत आशिषने मध्यस्थी केल्यामुळे बाचाबाची झाली होती.
यानंतर रात्रीच्या वेळी मृत आशिष हा घरासमोरील चौकात गेला असता तेथे पुन्हा आरोपी शुभमबरोबर त्याचा वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. अन् संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करायला सुरुवात केली. यादरम्यान शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मृत आशिष यास मारहाण ( Murder) करण्यास सुरुवात केली. त्यांनी मृत आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन ( Murder) तेथून पळ काढला. यानंतर आशिषच्या दोन मित्रांनी त्याला त्याला दुचाकीवर बसवून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप करीत आहे.
हे पण वाचा :
दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद
मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर
कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात
नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?
जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे