हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालविल्या जातात. त्याअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना कमी गुंतवणुकीवर जास्त रिटर्न देते. तसेच यामध्ये टॅक्स वाचवण्याबरोबरच कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. आता यामध्ये सरकारने आणखी तीन मोठे बदल केले आहेत.
हे लक्षात घ्या कि, यंदाच्या अर्थसंकल्प 2023 दरम्यान, सरकारकडून Post Office च्या दोन बचत योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासोबतच महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत विशेष बदल केले आहेत.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
अर्थसंकल्प 2023 दरम्यान, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे गुंतवणूकदार आता आधीपेक्षा दुप्पट गुंतवणूक करू शकतात. यापूर्वी ही रक्कम 15 लाख रुपये होती, ती वाढवून 30 लाख करण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी ही योजना 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 8 टक्के व्याजदर असून किमान 1000 रुपये जमा करता येतात. या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज करमुक्त नाही. Post Office
मासिक उत्पन्न योजना
चालू अर्थसंकल्पात MIS मधील गुंतवणुकीची मर्यादा 4 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. जॉईंट खात्यांतर्गत ही मर्यादा 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच गुंतवणूकदारांना या योजनेअंतर्गत दरमहा व्याजाचे पैसे मिळतील. सध्या या योजनेमध्ये 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज उपलब्ध आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. Post Office
महिला सन्मान बचत योजना
अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्र सरकारकडून या योजनेबाबत घोषणा करण्यात करण्यात आली होती. आता 1 एप्रिलपासून ही योजना सुरू होते आहे. गुंतवणूकीच्या योजनांमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग व्हावा या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. तसेच या योजनेमुळे देशातील अनेक गरीब महिलांना कमी वेळेत जास्त लाभ देखील मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 2 वर्षांसाठी 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यामध्ये 7.5% दराने व्याज मिळेल. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर