धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीकडून ३ दिवसाच्या चिमुरडीची हत्या 

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने ३ दिवसाच्या चिमुरडीचा निर्दयी खून केल्याची घटना समोर आली आहे. दगडाने ठेचून या चिमुरडीची हत्या करून पित्याने तिचा मृतदेह ओढ्यात फेकून दिला असल्याची माहिती गुरुवारी समोर आली. पत्नीने याबाबत फिर्याद दिली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. मक्तापूर भानसहिवरे शिवारात एका अर्भकाचा मृतदेह मिळाला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती.

मिळालेले अर्भक स्त्री जातीचे आहे असे समजले होते. पोलिसांनी परिसरात चौकशी केली तसेच शेजारच्या पारधी वस्त्यांवर ३०-३५ पोलिसांचा ताफा घेऊन शोधण्यासाठी गेले असता एक व्यक्ती शेतातून पळून जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पाठलाग करून या व्यक्तीला अजय मिरीलाल काळे असे या पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याचे वय ३७ असून नेवासे येथील मक्तापूर शिवारचा रहिवासी आहे. नगर आणि औरंगाबादच्या पोलिसांना अनेक गुन्ह्यात याचा शोध होता अशी माहितीही समोर आली आहे.

अजय च्या पत्नीची चौकशी केली असता तिने तो माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच त्याने माझ्या मुलीचा खून केला अशी माहिती दिली. आरोपीने मीच हत्या केली आहे अशी कबुली दिली आहे. नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मक्तापूर येथे पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंतिम  संस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here