हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PF Balance : जर आपण EPFO अंतर्गत पीएफ खाते वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयोगाची असल्याचे सिद्ध होईल. कारण आता पीएफ खातेधारकांना आपल्या खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आता तो घरबसल्या खाली दिलेल्या 4 पद्धतींनी सहजपणे तपासता येऊ शकेल.
मिस कॉलद्वारे
यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर, EPFO कडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये आपल्या पीएफ खात्याची माहिती मिळेल. हा कॉल UAN च्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून पाठवावा लागेल. PF Balance
एसएमएसद्वारे
जर आपण UAN EPFO मध्ये रजिस्टर्ड असाल तर आपल्या नवीनतम योगदानाची आणि PF बॅलन्सची माहिती एसएमएसद्वारे मिळू शकेल. यासाठी EPFOHO UAN ENG असे लिहून 7738299899 वर पाठवावा लागेल. यामधील शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. जर आपल्याला हिंदीमध्ये माहिती हवी असेल तर EPFOHO UAN HIN असे लिहून पाठवू शकता. हा एसएमएस देखील UAN च्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरूनच पाठवावा लागेल. PF Balance
EPFO वेबसाइटद्वारे
यासाठी EPFA वेबसाइटवर जावे लागेल.
जिथे Employee Centric Services वर क्लिक करा.
आता View Passbook वर क्लिक करा.
पासबुक पाहण्यासाठी UAN सह लॉगिन करा.
उमंग अॅपद्वारे
सर्वात आधी उमंग अॅप (UMANG) उघडा आणि EPFO वर क्लिक करा.
आता Employee Centric Services वर क्लिक करा.
येथे View Passbook पर्यायावर क्लिक करा.
UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका.
रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
ओटीपी टाकल्यानंतर पीएफ बॅलन्स तपासता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login
हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!