मागील २४ तासांत देशभरात ४२१३ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक संख्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची संख्या 67 हजारांच्या पुढे पोहचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 हजार 152 झाली आहे. गेल्या 24 तासात 97 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात 20 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 206 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढून तो 31.1 टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मे रोजी सुधारित डिस्चार्ज पॉलिसीची घोषणा करण्यात आली. आता डिस्चार्ज देण्यापूर्वी चाचणी करण्याची आवश्यकता नाही. डिस्चार्जनंतर रुग्णाला 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणं बंधनकारक आहे. ही डिस्चार्ज पॉलिसी अनेक देशांच्या अभ्यासातून करण्यात आली आहे. अभ्यासानुसार डिस्चार्ज पॉलिसीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment