महाराष्ट्रात ४३१ नवे करोना रुग्ण, १८ जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या ५६४९वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यभरात नवीन ४३१ रुग्ण सापडले. त्यामुळं रुग्णांची संख्या आता ५ हजार ६४९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज १८ जण दगावले आहेत. आज ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

दिवसभरात राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १० मुंबईत, २ पुण्यात, २ औरंगाबादमध्ये, १ कल्याण डोंबिवलीत, १ सोलापूरमध्ये, १ जळगावात तर एकाचा मृत्यू मालेगावात झाला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोना मृत्यूची एकूण संख्या २६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १४ पुरुष, तर ४ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत. तर १२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत, तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

”WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”

 

Leave a Comment