मुंबई । मुंबईत कोरोनाच्या संसर्गाच्या विळख्यात आता पत्रकार सुद्धा सापडले आहेत. मुंबईमध्ये ५३ पत्रकारांना कोरोनाची लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीएमसीमधील आरोग्य विभागाचे आधिकारी अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६७ पत्रकांराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५३ जणांनाकरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजतेय.
कोरोना आणि लॉकडाऊनसंबंधी वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना बऱ्याच ठिकाणी जावं लागत. अशात कोरोना संसर्गाचा धोका त्यांनाही असल्यानं गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या कोरोना टेस्टसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये १६८ जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार १६८ पैकी ५३ जणांचा टेस्ट रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
Official sources tell ANI some field reporters in Mumbai have tested positive for COVID19. More details awaited.
— ANI (@ANI) April 20, 2020
TV Journalists Association चे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या कोरोना टेस्टसाठी विशेष कॅम्प आयोजित केला होता. चिंता वाढवणारी बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये बर्याच जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणेही नव्हती. दरम्यान, अजूनही काही पत्रकारांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. त्यामुळे ही आकडेवारी आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”