लखनऊ : वृत्तसंस्था – बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात (accident) झाला आहे. आज सकाळी लोणीकटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मदरहा गावाजवळ एका भरधाव डबलडेकर बसने उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात (accident) 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
काय घडले नेमके ?
बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसचा लोणीकटरा पोलीस स्टेशन परिसरामध्ये भीषण अपघात (accident) झाला. नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ एक डबलडेकर बस आधीच उभी होती, तेव्हा सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या बसने येथे उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात (accident) झाला. त्यानंतर पोलिसांना तातडीने या अपघाताची माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील 35 हून अधिक जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर झालेल्या या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातातील (accident) जीवितहानी खूप दुःखद आहे. तातडीने मदत आणि बचाव कार्य आणि जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रभू श्री राम मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि जखमी रुग्ण लवकरात लवकर बरे होवो असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
हे पण वाचा :
अब राजा का बेटा राजा नही बनेगा; राज- बाळासाहेबांच्या फोटोतून मनसेला नेमकं काय म्हणायचं??
वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून 22 वर्षीय मुलाने केली सावत्र आईची हत्या
पाठीत खंजीर कुणी खुपसला हे योग्य वेळी सांगेन; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
IND vs WI 2nd ODI : टीम इंडियाने इतिहास रचला ! अजून कोणालाच जमला नाही ‘हा’ पराक्रम