पुणे । सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र काळजी घेतली जात आहे. आता संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून कामकाजाला सुरुवात केली जात आहे. मात्र हे करत असताना सामाजिक अलगावचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. आता आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार लोक मास्क खरेदी करत आहेत. पण पुण्यात एका इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. शंकर असे या इसमाचे नाव आहे. त्याने बनविलेल्या मास्कची किंमत चक्क २.९ लाख इतकी आहे. मध्यंतरी बाजारात लग्नसमारंभात तसेच इतर काही कार्यक्रमांमध्ये वापरण्यासाठी म्हणून सोन्या चांदीचे मास्क बनविले गेले होते. मात्र नेहमीच्या वापरासाठी असा सोन्याचा मास्क बनविणारा हा इसम त्याच्या मास्क तसेच मास्कचा किमतीमुळे चर्चेत आला आहे.
सध्या बाजारात विविध सृजनशील मास्क उपलब्ध झाले आहेत. आपल्या चेहऱ्यासारखा फेस मास्क प्रिंट करून देण्याची सुरुवात गुजरातमध्ये एका फोटोग्राफरने केली होती. आता मास्क वापरणे सक्तीचे असल्याकारणाने विविध प्रकारचे मास्क बाजारात येत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.