हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारक देखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना सादर केल्या जाव्यात असे उद्धव ठाकरेंनी म्हंटल.
दरम्यान, या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.