पुण्यात पुन्हा अग्नितांडव! 7 व्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलला लागली भीषण आग

Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील लुल्ला नगर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलला हि भीषण आग (fire) लागली आहे. हे हॉटेल इमारतीच्या सातव्या मजल्यावर आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळच्या सुमारास हि भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीने (fire) काही क्षणात रौद्ररुपधारक केले आहे. आगीचे (fire) लोट पसरत चालले आहे. आग लागल्यानंतर सिलेंडर स्फोटाचेही आवाज मोठ्या प्रमाणात आले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तळोजा एमआयडीसीतून निघत आहेत धुराचे लोट
तळोजा एमआयडीसीमधून रात्रीच्या अंधारात रसायन युक्त धूर सोडण्याचे काम सुरूच आहे. पावसाळा संपताच कंपन्या अशाप्रकारे दूर सोडत आहेत. या प्रदूषणामुळे खारघर,कलंबोळी,कामोठे,नावडे सह अन्य ठिकाणांचे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करून काहीच उपयोग होत नसल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…