मुंबई पुन्हा हादरली!! रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rickshaw Driver Raped Woman
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. आज पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत आरे कॉलनी मधील एका महिलेवर रिक्षाचालकाने बलात्कार केला आहे. रिक्षात बसलेल्या महिलेला निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण आणि मग बलात्कार कऱण्यात आलाय. सदर आरोपीचे नाव इंद्रजित सिंग असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. पोलिसांनी त्याला युपी मध्ये जाऊन बेडया ठोकल्या आहेत.

या घटनेला काही महिने झाले. तरुणीनं भितीपोटी घडलेल्या प्रकाराची वाच्यता केली नव्हती परंतु काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीची प्रसूती झाली होती. आणि त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तरुणीने कुटुंबियांसह दवाखान्यात धाव घेतली, त्यावेळी तिच्या शरीरावरील जखमा पाहून डॉक्टरांना शंका आली. अधिक चौकशी आणि चाचण्या केल्यानंतर महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार डॉक्टरांना आणि कुटुंबियांना सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी थेट पोलिसात तक्रार केली. पोलिसांनीही तात्काळ तपासाला सुरुवात करत आरोपीला ताब्यात घेतलं.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या मावशीला भेटण्यासाठी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे गेली होती. तिने मुंबईला परतण्यासाठी ऑटोरिक्षा बुक केली तेव्हा तिची आरोपींशी गाठ पडली. त्याने तिला गोरेगावला नेण्याऐवजी आरे कॉलनीतील निर्जन ठिकाणी रिक्षा वळवली. त्यानंतर सदर आरोपी चालकाने महिलेला गप्प राहण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार करून बलात्कार केला. गुन्हा केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन बेड्या ठोकल्या.