महाविकास आघाडीची युती बघायला मोठे साहेब असायला हवे होते; आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या महा विकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप भाजपकडून केला जात असताना आता शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. आजची शिवसेनेची युती किती चांगली आहे. बाळासाहेब आणि पवार साहेबांची मैत्री ही तेव्हापासून आणि वर्षानुवर्षे होती. त्यामुळेच आज महा विकास आघाडीची युतीझाली आहे. हि युती बघायला मोठे साहेब असायला हवे होते, असे म्हणत ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.

मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रसंगी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर राहिलो. कारण मला राजकारणात रस होता. मी त्यांच्या बरोबर दौऱ्याला निघून जात असे. राजकारणात ही सगळी मंडळी अग्रेसर होती, पुढे होती.

महाजन, मुंडे साहेब यांच्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय स्टेजवरून टोकाची टीका, आरोप- प्रत्यारोप व्हायचे. पण पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. मैत्री विसरले नाहीत. खोट्या केसेस, गुन्हे दाखल करणे कधीच झाले नाही, असा टोला यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपला लगावला.