व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढविण्याचा आम आदमी पार्टीचा निर्धार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र घेण्यात आलेल्या पहिला निर्धार मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार असल्याची माहीती आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली.

यावेळी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, खजिनदार सागर भोगावकर, प्रदेश सचिव दीपक सिंग हे यावेळी उपस्थित होते. राजुरे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर आम आदमी पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र येथे पक्षाने संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू केली आहे. सर्वसामान्यांचे जीवनावश्यक प्रश्न आणि इंधन दरवाढ तसेच महागाई या मूलभूत प्रश्नांवर विविध माध्यमातून सनदशीर मार्गाने आंदोलने करून संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न याशिवाय विकासाच्या विकासाच्या प्रश्नावर विविध उपाय योजना आणि निधीसाठी पाठपुरावा याकरिता आम आदमी पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

सागर भोगावकर पुढे म्हणाले, सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेत आहे. आतापर्यंत 16 मेळावे झाले आहेत. आम आदमी पक्षाची धेय्य धोरणे तळागाळात पोहोचण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, बेरोजगारी वाढते, सरकारने दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. कोरोना काळात आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय तिथे डुकरांचा वावर अधिक आहे. सेवाभावी साठी जे सरकार आलं आहे पण त्याकडे सध्या दुर्लक्षच आहे अन ही जाणीव होण्यासाठी आम आदमी पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. 2014 नंतर निवडणूक महाराष्ट्रात लढवल्या नाहीत 2019 मध्ये काही ठिकाणी जागा लढवल्या आहेत.