नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीच्या समर्थनात आज आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
‘शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या’ अशी घोषणाबाजी करत ‘आप’चे खासदार भगवंत मान आणि संजय सिंग यांनी पंतप्रधान मोदींना दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत याची आठवण करून देण्याचा प्रयन्त केला.
मोदी सरकार की बंद आँखों और कानों को खोलने के लिए लोकसभा के सेंट्रल हॉल में गूँजे किसान हितेषी नारे…! pic.twitter.com/l2UYEh8jRg
— Bhagwant Mann (@BhagwantMann) December 25, 2020
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, वकील मदन मोहन मालविय तसंच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संसद भवनात दाखल झाले. यावेळी आम आदमी पक्षाच्या खासदारांनी कृषी कायद्यांविरोधात चक्क संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर अनपेक्षितपणे जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी त्यांच्या हातात फलकही होते. ‘शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या, शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं बंद करा, हमीभावाची गॅरंटी द्या, लाखो शेतकरी थंडीत कुडकुडत मरत आहेत. अन्नदाता मरत आहेत’, अशा घोषणा आप खासदारांकडून करण्यात आल्या. परंतु, या घोषणांकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर ते तिथून निघून गेले. यादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घोषणा देणाऱ्या खासदारांना अडवण्यात आलं.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’