सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे Aarogya Setu अ‍ॅप असणं बंधनकारक- केंद्र सरकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. या काळात सर्व प्रशासनिक यंत्रणा कोरोनाच्या छायेत काम करत आहेत. अशा वेळी सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप फोनमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक असेल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १०० टक्के म्हणजे सर्व कर्मचार्‍यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असेल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांच्या प्रमुखांची असेल’, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केले आहे.

आरोग्य सेतू हे अ‍ॅप करोना व्हायरसला रोखण्याच्या हेतूने डिझाइन केलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे सर्व लोक त्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करतील याची स्थानिक प्रशासनाने खात्री करावी, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.दरम्यान, आरोग्य सेतू अ‍ॅप सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले होते. पण, आता सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनाही हे अ‍ॅप बंधनकारक केले आहे.

असं काम करत आरोग्य सेतू अ‍ॅप
करोना व्हायरसच्या धोक्यापासून युजरला अलर्ट करतं. हे अ‍ॅप संपर्क ट्रेसिंगद्वारे आणि युजर्सच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे त्याच्याभोवती कोरोना संक्रमित असेल तर त्याची माहिती देते. याशिवाय या साथीच्या आजाराशी संबंधित बरीच महत्वाची माहितीही दिली जाते. कोरोना संसर्गापासून बचाव आणि लक्षणांचीही माहिती मिळते. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा देशाला केलेल्या संबोधनात आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केलं होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment