हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही वर्षांपासून राज्यात विविध तपासयंत्रणांचे धाडसत्र सुरु आहे. यामुळं राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून महाराष्ट्र हे रेड राज्य झालंय, अशी टीकासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अब्दुल सत्तार (abdul sattar) यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा, अशी मागणीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिवेशनात केली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात 28900 रेड पडल्या आहेत. आपलं राज्य म्हणजे “रेड राज्य” झालं आहे. न्यायालयाचा वापर राजकीय हत्यार म्हणून वापर होतो आहे. हे दुर्दैव आहे, असेदेखील पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच अनिल देशमुख यांना वर्ष दीड वर्ष आत ठेवलं, नवाब मलिक अजून आत आहेत. यावर आता अजून काय बोलणार? असा संतप्त सवालदेखील त्यांनी यावेळी विचारला.
ज्यांनी घोटाळे केले ते उघडकीस आले तर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यायला हवी. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत अब्दुल सत्तारांना (abdul sattar) बाजूला ठेवा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वच्छ प्रशासन द्यायचे असेल तर त्यांनी कारवाई करावी, असंदेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..