धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | पुणे मुंबई एक्सप्रेसवर धनंजय  मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या अंग रक्षकाला इजा झाली आहे. तसेच धनंजय मुंडे अन्य गाडीत बसले असल्याने त्यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. हा अपघात आज रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास झाला आहे.

पुणे मुंबई एक्सप्रेसवरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला असताना लोणावळ्याजवळील औंढे पुलाजवळ त्याच्या ताफ्यातील इंडेवर कारचा टायर निखळल्याने सदर गाडी वेगात रस्त्याच्या बाजुला पलटी झाली. या गाडीमध्ये धनंजय मुंडे यांचा एक अंगरक्षक व दोन चालक होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सकाळच्या सुमारास धनंजय मुंडे यांचा ताफा मुंबईला निघाला असताना, मळवली जवळील औंढे पुलाजवळ मुंडे यांच्या गाडीच्या मागे असलेल्या इंडेवर मोटारीचे चाक निखळल्याने सदर गाडी रस्त्यावर पलटी झाली, यावेळी अन्य दोन गाड्या एकमेकाला धडकल्या. या अपघातात मोटारीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात धनंजय मुंडे यांचा अंगरक्षक सोपान चाटे, कारचा चालक व्यंकट गिते व संतोष जाधव यांनाही किरकोळ मार लागला आहे.

Leave a Comment