मुंबईतील दुर्घटना : मालाडमध्ये चार मजली इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू

दुर्घटनेतील मृत आणि जखमीची नांवे जाहीर

मुंबई | मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू 7 जण जखमी झाले असून अद्याप बचाबकार्य सुरू आहे. इमारत पडली त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अग्रिशामक दलाने स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या 15 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश आले. मालाडमधील मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. जखमींना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारत कोसळली. बचावकार्य सुरू आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अन्य कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तर मुंबईत बुधवारीपासून मान्सूनचे आगमन झाले. पावसाच्या तडाख्यात मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. उपनगरात पावसाचा जोर अधिक होता.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी

साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष,  अरिफा शेख- 8 वर्ष, अज्ञात (पु) – 40 वर्षे, अज्ञात (पु)- 15 वर्षे, अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे, अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे, अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे, अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे, अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे, अज्ञात (पु) – 8 वर्षे, जॉन इराना- 13 वर्ष

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी

मरी कुमारी रंगनाथ- (वय- 30), धनलक्ष्मी बेबी- (वय- 56), लीम शेख- (वय- 49), रिजवाना सय्यद- (वय -33), सूर्य मनी यादव- (वय-39), करीम खान (वय- 30), गुलजार अहमद अन्सारी- (वय -26)

You might also like