व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; 4 जण जागीच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कासा पोलीस स्टेशन हद्दीत कार आणि लक्झरी बसमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, गुजरातहून मुंबईकडे कारने एक कुटूंबीय जात होते. दरम्यान त्यांची कार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून निघाली असताना डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर महालक्ष्मी मंदिराजवळ कार असताना कारमधील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार बाजूने मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरी बसवर धडकली.

या अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील प्रवाशी गुजरातच्या बारडोली मधील राहणारे होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून अपघाताचा कासा पोलीसांकडून अधिक तपास केला जात आहे.